Saturday, February 25, 2017

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!

मराठी राजभाषा दिनाच्याImage may contain: text हार्दिक शुभेच्छा...!!

Thursday, November 17, 2016

Be your character what it will, it will be known, and nobody will take it upon your word

Sunday, July 26, 2015

वळून पाहणार नाही.

हिरव्या डोंगरमाथ्यावर रानफुलं वेचत
नाचत होते..
अन अचानकअडकला पदर..
वळून पाहिले तर
काटेरी झुडूप..
कुठून अवचित तू आलास नि
धागा अन धागा जपत हलकेच सोडवलास..
अन मी मात्र गुंतले तुझ्यात..
मग गुलाबी डोंगरमाथ्यावर
रानफुलं उधळत
धावत राहिले..
मग अडकला पदर..
वळून पाहिले तर
तू..
मी न बोलताही उत्तर दिलेला
प्रश्न डोळ्यांत घेऊन निरुत्तर उभा..
तू पदर अलवार सोडूनही दिलास..
सोडलास..
मग उजाड डोंगरमाथ्यावर
सुकलेली रानफुलं घेऊन
चालत राहिले..
आज परत ,पदर अडकलाय..
काट्यांत की तुझ्या हातात ?
वळून पाहणार नाही..
अशीच राहीन उभी..
भ्रम जपत..
तुटे पर्यंत.

मलमली तारुण्य माझे…

मलमली तारुण्य माझेतू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्यातू जीवाला गुंतवावे..
लागुनि थंडी गुलाबीशिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे..
कापर्‍या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
रेशमी संगीत स्पर्शाचेपुन्हा तू पेटवावे..
रे तुला बाहुत माझ्यारुपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावेतू मला बिलगून जावे
सुरेश भट

Thursday, April 3, 2008

मैत्री!!!!!!!

मैत्रीचे नाते हे पिंपळाच्या पानासारखे असायला हवे ,त्याची कितीही जाळी झाली तरी ते पान जीवनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवायला हवे.जीवन हे एका समुद्राप्रमाणे आहे , ह्रदय हा किनारा अन् मित्र हे लाटांप्रमाणे हे महत्वाचे नाही की लाटा किती आहेत ? महत्वाचे म्हणजे.." किती लाटा किनार्‍यास स्पर्श करून जातात .."असावं कोणीतरी आपली वाट पाहणारं.आपल्यावर रागावून स्वतःच माफी मागणारंआपल्यातच स्वतःला हरवून जाणारंअसावं कुणीतरी मनातल्या मनात मैत्रीचं नातं हळूवार जपणारं.. !!!!!!!

Refresh yourself...





































Nice one!!!